Wednesday, July 3, 2024

‘माझी शॅम्पू पोझ!’ शिवानी रांगोळेच्या फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या ‘सांग तू आहेस का’ हा मालिकेद्वारे रोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सतत आपले नवनवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोला खूप प्रेम देत असतात. नुकतेच तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

तिने शेअर केलेल्या फोटोंसोबतच त्याखालचे मजेदार कॅप्शनही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये ती रंगीबेरंगी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली आहे. यातील तिची हॉट पोझ चाहत्यांना चांगलीच पसंत पडली आहे. मात्र स्वतः शिवानीला ही पोझ मजेदार वाटली आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने डोक्यात हात घालून अनोख्या स्टाईलमध्ये पोझ दिली आहे. त्यामुळे या पोझला साजेसं असं कॅप्शन तिने दिलं आहे. (marathi actress shivani rangole shared her shampoo pose on instagram)

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझी शॅम्पू करतानाची पोझ.” तिला जरी ही मजेदार वाटली असेल, मात्र चाहत्यांना तिचा हा हॉट अंदाज चांगलाच भावला आहे. चाहते फोटोखाली कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत. एक चाहत्याने मजेदार अंदाजात कमेंट करत लिहिलं आहे की, “माझं हृदय आता शॅम्पू शॅम्पू झालंय!”

शिवानीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेद्वारे टीव्ही जगात पाऊल ठेवले होते. पुढे तिने ‘बन मस्का’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत काम केले आहे. याशिवाय ती ‘अँड जरा हटके’, ‘फुंतरू’, ‘डबल सीट’, ‘चिंटू २’ या चित्रपटात झळकली आहे. विशेष म्हणजे शिवानीने बऱ्याच नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा