कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यात मेकअप, ड्रेस, अभिनय, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या असतात. मात्र, यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशूट. कलाकार नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठे हिचा समावेश होतो. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रुतीने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा अतिशय सुंदर स्कर्ट आणि ब्लाऊज घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने गळ्यात हेवी नेकलेस आणि मोठे ईअरिंग घातले आहेत. तसेच एक हातात बांगडी आणि बोठात अंगठी घातली आहे. या फोटोमध्ये तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Shruti Marathe share her new photos on social media)
श्रुतीने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करआत हेत. या फोटोवर तिच्या एका चाहत्याने “ऐकत नाही राव,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका कमेंट केली आहे की, “अरे माणसाने किती सुंदर दिसावे की, समोरचा बेशुद्ध व्हावा,” दुसऱ्या एका चाहत्याने “सिंड्रेला,” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे या फोटोवर कौतुकाचा पाऊस पडत आहे.
श्रती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी
-‘बॅट जरा छोटीच पडली’, म्हणत अमिताभ बच्चन यांनी क्रिकेट खेळतानाचा फोटो केला शेअर
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन