Tuesday, July 9, 2024

‘…बायको असावी तर तुझ्यासारखी’, बार्बी डॉल श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्याची कमेंट आली चर्चेत

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहे. पण सध्या सोशल मीडियावर बोल्डनेसच्या बाबतीत एका अभिनेत्रीचे पारडे चांगलेच जड ठरतं आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची राधा म्हणजेच श्रुती मराठे होय. श्रुती मराठेने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिच्या साध्या पोषाखाने तसेच मनमोकळ्या स्वभावाने तिने समस्त महाराष्ट्राला भुरळ घातली होती. आताही ती यात काही कमतरता पडू देत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी जोडून आहे. अशातच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्रुतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रुतीने क्रीम कलरचा एक शॉर्ट ड्रेस घातला असून, या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती अत्यंत गोड दिसत आहे. यासोबत तिने पायात हाय हिल्स घातले आहेत, तर कर्ली हेअर्स करून तिने या गेटअपला आणखी सुंदर लूक दिला आहे. यावर तिने हलकासा पण अत्यंत सुंदर मेकअप केला असल्यामुळे ती अगदी एका बाहुलीसारखी दिसत आहे.

श्रुतीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कोणी तिला ‘बार्बी डॉल’ म्हणत आहे, तर कोणी ‘परम सुंदरी’ म्हणत आहे. तिच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर “किती गोड दिसतेस गं तू! बायको हवी तर तुझ्यासारखी” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने “झोप उडाली, बेशुद्ध पडायचं बाकी आहे, नुसता जाळ” अशी कमेंट केली आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोला आतापर्यंत ४० हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (marathi actress shruti marathe’s photo viral on social media)

श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा