Monday, February 24, 2025
Home मराठी आनंदी आनंद गडे! स्मिता तांबेच्या घरी लक्ष्मीचे आगमन; पडतोय शुभेच्छांचा पाऊस

आनंदी आनंद गडे! स्मिता तांबेच्या घरी लक्ष्मीचे आगमन; पडतोय शुभेच्छांचा पाऊस

अनेक कलाकाराच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होत आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे तिच्या घरात सध्या आनंदोत्सव सुरू आहे.

माध्यमातील वृत्तानुसार शनिवारी (४ सप्टेंबर) स्मिताला मुलगी झाली आहे. पण अभिनेत्रीने याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मागील काही दिवसांपूर्वी स्मिताचे डोहाळेजेवण झाले होते. तेव्हा तिने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. तिच्या अनेक मैत्रिणींना तिचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला होता. स्मिताने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या क्षणी जेव्हा तुमच्या मैत्रिणी अचानक तुमच्या घरी सरप्राइज द्यायला येतात. खूप मस्ती आणि खूप खूप प्रेम फुलवा, रेशू ताई, आदिती, अमृता.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच सगळेजण तिचे अभिनंदन करत आहेत. (Marathi actress smita tambe give a birth to baby girl)

अभिनेत्री स्मिता तांबे हिने २०१९ मध्ये नाट्य कलाकार वीरेंद्र द्विवेदीसोबत लग्न केले आहे. त्यांनी महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन पद्धतीने हे लग्न केले होते. ती अनेकवेळा तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘बायोस्कोप’, ‘गणवेश’, ‘ट्रकभर स्वप्न’, सिंघम रिटर्न्स’, ‘रुख’, ‘देऊळ’, ‘परतू’ यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. या व्यतिरिक्त स्मिताने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत डॅशिंग मम्मीची भूमिका साकारुन सगळ्या चाहत्यांची मनं जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा