Sunday, June 8, 2025
Home मराठी सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना सोशल मीडियावर शेअर करत असते. मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर तिचा वावर चांगलाच वाढला आहे. सातत्याने ती तिचे फोटो शेअर करत आहे. अशातच तिचा एक स्टाइलिश लूक समोर आला आहे.

सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने राखाडी रंगाचा टॉप घातला आहे. तसेच शॉर्ट पँट घातली आहे. या फॅशनेबल ड्रेसवर तिने ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे. तसेच हातात बांगड्या घातल्या आहेत. तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. यावर तिने एक बॅग देखील घेतली आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “बैरागी… बैरागी का सूती चोला ओढके चली.” तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (Marathi actress sonalee Kulkarni share her photos on social media)

या फोटोवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत. प्रार्थना बेहेरे हिने “वॉव” अशी कमेंट केली आहे. तर फुलवा आणि क्रांती रेडकर यांनी तिच्या या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच अभिनेता हेमंत ढोमे याने “घात झाला” अशी कमेंट केली आहे.

सोनालीने या आधी देखील तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तिचा फॅशन सेन्सची आजकाल सर्वत्र चर्चा चालू आहे.

सोनाली मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’, ‘क्षणभर विश्रांती’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आयपीएल आधी ‘कॅप्टन कूल’ने केला रॉकस्टार लूक चाहते; म्हणाले, नको रे राहू ‘या’ अभिनेत्यासोबत

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

-दीपिका कक्करला शोएबच्या घरातील ‘नोकरानी’ म्हणल्याने भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘तुमच्या आईलाही असंच बोलता का?’

हे देखील वाचा