अलीकडे अभिनेत्री फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही, तर त्यांच्या हॉट आणि बोल्डनेसमुळेही चर्चेचा विषय ठरतात. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री नेहमीच त्यांच्या बोल्डनेमुळे चाहत्यांचे लक्ष वेधतात. मात्र, आता मराठी सिनेविश्वातील अभिनेत्रीही बोल्डनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीना टक्कर देत आहेत. ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचादेखील बोल्ड अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सोनाली जितकी पारंपारिक वेशभूषेत सुंदर दिसते, तितकेच ती बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. अशात तिचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना भुरळ घालत आहे. एका चाहत्याने तिच्या या पोस्टवर कमेंट भलतीच मागणी केली आहे. याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सोनालीचे लेटेस्ट फोटोशूट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम (Sonalee Kulkarni Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर 2 मिलियन म्हणजेच तब्बल 20 लाख चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या पोस्टला हजारो-लाखो लाईक्स मिळतात. अशात सोनाली कुलकर्णी लेटेस्ट फोटोशूट (Sonalee Kulkarni Latest Photoshoot) घेऊन इंस्टाग्रामवर येताच, तिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये सोनाली खूपच हॉट दिसत आहे. सोनालीने कॅप्शनमध्ये फक्त एक इमोजीचा समावेश करत ही पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
चाहत्याची लक्षवेधी मागणी
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या या हॉट पोस्टवर काही मिनिटातच 3 हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, चाहते एकापेक्षा एक कमेंट करत तिचे कौतुकही करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “हॉटनेस ओव्हरलोड.” दुसऱ्या एकाने हार्ट इमोजीचा वापर करत हिंदीत कमेंट केली की, “तू समज नही सकती या समजना नही चाहती की तुम क्या क्या कर सकती हो.” याव्यतिरिक्त एका चाहत्याने मागणी करत कमेंट केली की, “खूप दिवस झाले गं तू एकही बीचवेअरमध्ये फोटोशूट केले नाही…आम्ही वाट पाहतोय…” अशाप्रकारे चाहते कमेंट्स करत तिचे कौतुक करत आहेत.

सोनालीचा आगामी सिनेमा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अखेरची ‘डेट भेट’ या सिनेमात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांच्याही भूमिका होत्या. अशात सोनाली ‘मलाइकोट्टई वालीबान’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) दिसणार आहेत. (marathi actress sonalee kulkarni shared hot and bold photos on instagram fan comment viral)
महत्त्वाच्या बातम्या-
सनीच्या Gadar 2चा विषयच खोल! ट्रॅक्टरमध्ये बसून चाहत्यांनी गाठलं थिएटर, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडिओ
‘काही लोक रातोरात यशस्वी होतात, काहींना स्वत:ला सिद्ध…’, ‘OMG 2’च्या रिलीजनंतर यामीचे मोठे भाष्य