Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड ‘काही लोक रातोरात यशस्वी होतात, काहींना स्वत:ला सिद्ध…’, ‘OMG 2’च्या रिलीजनंतर यामीचे मोठे भाष्य

‘काही लोक रातोरात यशस्वी होतात, काहींना स्वत:ला सिद्ध…’, ‘OMG 2’च्या रिलीजनंतर यामीचे मोठे भाष्य

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम अभिनित ‘ओएमजी 2‘ सिनेमा शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) देशभरात रिलीज झाला. या सिनेमातील डायलॉग्जपासून ते कोर्टरूम आणि कॉमेडी सीक्वेन्सपर्यंत सर्व गोष्टी चाहत्यांना आवडताना दिसत आहेत. या सिनेमात पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या यामीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सोशल मीडियावर एका युजरने तिला अंडर युटीलाईज्ड म्हणजेच तिचा कमी वापर केल्याचे म्हटल्यामुळे अभिनेत्रीने प्रत्युत्तर देत अनुभव शेअर केला आहे.

युजरकडून यामीचं कौतुक
खरं तर, एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “ही हैराणीची बाब आहे की, यामी गौतम कशाप्रकारे प्रत्येक वेळी आपल्या परफॉर्मन्सने आम्हाला हैराण करते! #OMG2 कोणताही अपवाद नाहीये. ती आपल्या प्रत्येक फ्रेमची मालकीण आहे! तिचे मौनही खूप काही बोलून जाते. मला ‘अंडररेटेड’ शब्दाची चीड आहे. मी फक्त एवढंच म्हणेल की, आपल्या निर्मात्यांनी तिचा कमी वापर केला आहे.”

‘काही लोकांना रातोरात यश मिळते…’
या ट्वीटला प्रत्युत्तर देत अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने लिहिले की, “काही लोकांना रातोरात यश मिळते, काही लोकांना वर्षोनुवर्षे सतत स्वत:ला सिद्ध करावे लागते. काही लोक आपल्या प्रतिभेची (किंवा त्याची कमतरता) मार्केटिंग करण्यात महान असतात, काही लोक फक्त आपल्या प्रतिभेबाबत बोलू इच्छितात. एक अभिनेत्री म्हणून मला फक्त माझा अभिनय करायचा माहितीये. चांगली स्क्रिप्ट आणि चांगल्या पात्रांची ओळख करण्यासाठी मी जास्त मेहनत करते. हीच माझी प्रतिभा आहे.”

‘मी माझ्या प्रतिभेची मार्केटिंग जास्त समजत नाही’
पुढे बोलताना तिने असेही लिहिले की, “मी माझ्या प्रतिभेची मार्केटिंग जास्त समजत नाही किंवा त्यात सामील होत नाही. दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीतील अधिकतर लोक कोणत्याही स्क्रिप्ट किंवा पात्रावर नाही, तर कुण्या व्यक्ती किंवा प्रोजेक्टच्या मार्केटिंगवर अवलंबून असतात. कदाचित त्यामुळेच काही लोकांना वाटते की, माझा कमी वापर केला जात आहे.”

चाहत्याला धन्यवाद
यासोबतच अभिनेत्रीने त्या युजरला पुढे धन्यवादही दिला. तिने लिहिले की, “तसेही तुमच्या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद आविष्कार. हे खूपच उत्साही आहे.”

तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत 15 टक्के वाढ
यामीच्या ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पहिल्या दिवशी फक्त जवळपास 10 कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तिसऱ्या दिवशी 16.50 ते 18 कोटींची कमाई केली आहे. (actress yami gautam reaction on calling her under utilized after omg 2 release know here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘गदर 2’ आणि ‘जेलर’शी टक्कर होऊनही ‘OMG 2’ने रविवारी छापले ‘एवढे’ कोटी, 15 टक्क्यांनी वाढली कमाई
नाद केला पण पुरा केला! ‘तारा-सकीना’च्या ‘Gadar 2’ने तिसऱ्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, ‘पठाण’चाही विक्रम तुटला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा