Sunday, June 8, 2025
Home मराठी जेव्हा सोनाली कुलकर्णीने घेतलं ‘कडकलक्ष्मी’चं रूप! अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जेव्हा सोनाली कुलकर्णीने घेतलं ‘कडकलक्ष्मी’चं रूप! अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) बरीच चर्चेत असते. या चर्चेचा विषय म्हणजे, तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live). या चित्रपटाबाबत सतत बातम्या कानावर येतच आहेत. सोशल मीडियावरुन चित्रपटाचे कलाकारही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. सध्या सोनालीची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे. सोनालीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हे ट्वीट केले आहे.

सोनाली कुलकर्णी ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच सोनाली सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सध्या सोनाली कुलकर्णीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या आगामी चित्रपटात गाणे गायला मिळाल्याचे सांगितली आहे. (marathi actress sonalee kulkarni viral tweet)

ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलंय की, “पहिल्यांदाच सिनेमातल्या आपल्या पात्रासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आणि ती देखील अश्या गाण्यासाठी,स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनातलं, जेव्हा स्री कडकलक्ष्मी चं रूप घेते,” या पोस्टसोबत सोनालीने गाण्याची लिंकही शेअर केली आहे. सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच रागात असल्याचे वाटत आहे. सध्या तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

‘तमाशा लाईव्ह’सोबतच सोनाली ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा