Saturday, December 7, 2024
Home मराठी Tamasha Live | आली रे आली! ‘कडक लक्ष्मी’ बनून सोनाली कुलकर्णी रसिकांच्या भेटीला

Tamasha Live | आली रे आली! ‘कडक लक्ष्मी’ बनून सोनाली कुलकर्णी रसिकांच्या भेटीला

मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) तिचे ग्लॅमरस लूकमधील एकामागून एक फोटो शेअर करतच असते. ‘हिरकणी’ फेम अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सिनेसृष्टीतही चांगलीच सक्रिय आहे. एकामागून एक दमदार चित्रपटाने ती चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी देत आहे. तसेच अभिनेत्री लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ (tamasha live) या चित्रपटात दिसणार आहे.

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील गाण्यांना रसिकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान सोनाली कुलकर्णीचे ‘कडक लक्ष्मी’ हे गाणे रिलीझ झाले असून, याला देखील चाहत्यांची पसंती मिळत आहे. गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर क्षितीज पटवर्धन यांनी ते शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. खास बाब म्हणजे, हे गाणे स्वत: सोनाली कुलकर्णीने गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. गाण्याचे नाव ‘कडक लक्ष्मी’ असून नावाप्रमणेच या गाण्याचे बोल आहेत. (tamasha lives kadak laxmi song out)

‘कडक लक्ष्मी’ गाण्याबद्दल गीतकार क्षितीज पटवर्धन सांगतात की, “हे गाणे मी शब्दबद्ध केले असले तरी सोनालीने अगदी उत्तमरित्या ते परफॉर्म केले आहे. मुळात हे गाणे तिने स्वतः गायले आहे. त्यामुळे या गाण्यातील भावना या तिच्या चेहऱ्यावर आपसुकच दिसून येत आहेत.’’

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा