मराठी चित्रपटसृष्टीतील सोनाली कुलकर्णी ही ग्लॅमरस अभिनेत्री सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती विवाह बंधनात अडकली आहे. या गोष्टीची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की, सोनाली कुलकर्णीच्या पुण्यातील घरावर हल्ला झाला आहे.
सोनाली कुलकर्णी ही पुण्यात निगडी येथे राहते. तिच्या पुण्यातील घरावर हल्ला केला आहे. तिच्या घरावर एका चोरट्याने हल्ला केला आहे. यावेळी त्या चोरट्याने तिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला, पण सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही. या प्रकारामुळे त्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सोनालीच्या निगडी येथील घरात घुसून हल्ला केलेला व्यक्ती तिचा चाहता आहे. तिच्या बंगल्यात तो रात्री अचानक दोरीच्या साहाय्याने बालकनीमध्ये आला. सोनालीच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याने काहीच ऐकले नाही. त्यानंतरही तिच्या वडिलांनी खूप वेळा जाण्यास सांगितले, पण त्याने नंतर त्याच्या जवळील चाकू काढला आणि तिच्या वडिलांच्या हातावर घाव केला. त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे.
यानंतर त्यांच्या घराजवळील अनेक लोकांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो काही हाती नाही लागला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितले की, तो सोनालीचा चाहता आहे आणि त्याला तिच्या घरातच राहायचे आहे. परंतु त्याच्या जवळ चाकू आणि मिरची पूड सापडली. त्यामुळे तो खरचं सोनालीचा चाहता आहे की, चोरी करण्याच्या निमित्ताने घरात जबरदस्ती घुसला होता या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत.
सोनालीने काही दिवसांपूर्वी कुणाल बेनोडकर याच्याशी विवाह केला आहे. तिने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे.
त्या दोघांचं लग्न परदेशी झाल्यामुळे या लग्नात सोनालीचे आई- वडील प्रत्यक्षात या लग्नाला उपस्थित राहिले नाही, पण त्यांनी या लग्नाला ऑनलाईन हजेरी लावली होती.
सोनाली मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…