गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. कधी ग्लॅमरस, कधी हॉट, तर कधी पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अशातच सोनालीने तिच्या नवीन लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
‘अप्सरा’ सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने गुलाबी रंगाचा अत्यंत स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. तिने कमरेला चॉकलेटी रंगाचा एक बेल्ट लावला आहे. कानात हिरव्या रंगाचे इअरिंग घातले आहेत आणि पायात हाय हिल्स घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिचे अनेक चाहते तिच्या या ड्रेसचे कौतुक करत आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. याआधी देखील सोनालीने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. सोनाली लवकरच ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक या शोमधील आहे. (marathi actress sonalee kulkarni’s new look viral on social media)
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट
-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!










