Friday, April 11, 2025
Home कॅलेंडर गुलाबी रंगात ‘अप्सरेचं’ सौंदर्य आणखीनच खुललं, सोनालीच्या अदा अन् सौंदर्य पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

गुलाबी रंगात ‘अप्सरेचं’ सौंदर्य आणखीनच खुललं, सोनालीच्या अदा अन् सौंदर्य पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

मराठी सिनेरसिकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’, ही सध्या अधिकच चर्चेत असल्याचे दिसत आहे. नवनवीन ठिकाणांवरुन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ती तिच्या चाहत्यांना सुखद धक्के देत असते.

कधी ब्लॅक साडीतील सौंदर्य तर आता पिंक ड्रेसमधील मादक अदा, सोनालीच्या या नवनव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक आणि कमेंटचा तूफान पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोनालीने नुकतेच ती कर्नाटकमध्ये असल्याचे सांगितले होते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती तिच्या चाहत्यांना दिलीये.

नुकतेच सोनालीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. कर्नाटकात पाऊस पडल्याचे देखील सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सोनाली गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंना पसंती दर्शववत त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत सोनाली कुलकर्णीने पडद्यावर पदार्पण केले. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

आजही अप्सरा आली म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त सोनालीच दिसते, हेच तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याची मोहीनी असल्याचे द्योतक आहे. लवकरच ती थ्री चिअर्स टू’सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे.

हे देखील वाचा