Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड

सोशल मीडियावर सिने जगतातील कलाकारांचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात. यामध्ये अनेक कलाकारांचे बालपणीचे गोंडस फोटो व्हायरल होत असतात. हे व्हायरल फोटो नेमके कोणत्या कलाकाराचे आहेत हे ओळखणे त्यांच्या चाहत्यांनाही कठीण होऊन बसते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. जो एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा असल्याचे बोलले जात आहे. कोण आहे ती मराठी अभिनेत्री चला जाणून घेऊ. 

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांइतकेच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या कलाकारांच्या चित्रपटांची त्यांच्या फोटोंची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्यांच्या चाहत्यांनाही आपल्या लाडक्या नायकाबद्दल, नायिकेबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. अनेक अभिनेत्री त्यांच्या बालपणीचे गोड फोटोही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक लहान गोंडस मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा असल्याचेही बोलले जात आहे.

या फोटोमध्ये एक गोंडस मुलगी बसलेली दिसत आहे. पिवळ्या रंगाचा फ्रॉक, लालतपकिरी केस असा गोड लूक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.  आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर सांगतो की या फोटोमध्ये दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit) आहे. जिने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील गोंडस गोड बालपणीची तेजस्विनी आता मात्र तिच्या चाहत्यांना ओळखेनाशी झाली आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे ज्यामध्ये अनेकांनी किती गोड म्हणत तिचे कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर या मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. आईच्याच पाऊलावर पाऊल ठेवत तेजस्विनीनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत वरच्या स्थानावर आहे.(marathi actress tejaswini pandit childhood picture viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री उतरली ‘या’ व्यवसायात, जाणून घेतलंच पाहिजे

पाकिस्तानी मालिकेत ‘वैवाहिक बलात्काराचा’ सीन? लेखिकेच्या ‘त्या’ बोल्ड वक्त्यव्यावर चाहते नाराज

हे देखील वाचा