Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘… बताओ ना तुम इश्क करती हो या इलाज’, तेजस्विनी पंडितचे सौंदर्य पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. अशातच तिचा आणखी एक मनमोहक फोटो समोर आला आहे.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अत्यंत सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. यासोबत तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. कपाळी साडीला मॅचिंग आकाशी रंगाची टिकली लावली आहे. हातात लाल आणि आकाशी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तसेच तिने कर्ली हेअर करून तिच्या केसांना एक वेगळा लूक दिला आहे. या फोटोमध्ये खास करून तिची स्माईल खूप छान दिसत आहे. (Marathi actress tejaswini pandit’s saree look photo viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “जिंदगी आसान करने का राज बताऊ? ज्यादा कुछ नहीं बस मुस्कान पहनो और निकल पडो.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तेरी एक मुस्कान से सुधर जाती है तबीयत मेरी, बताओ ना इश्क करती हो या इलाज.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ये है रेशमी जुल्फो का अंधेरा.” तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला रोज जरी पाहिलं, तरी…’, सायलीचा फोटो पाहून चाहता झाला कवी, पायातल्या मोजाची रंगलीय चर्चा

-‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार ‘रिटा रिपोर्टर’चा जलवा; बोल्ड फोटोंनी करते सोशल मीडियावर राडा

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

हे देखील वाचा