Tuesday, July 9, 2024

अतिसुंदर! गणरायाची आराधना करत, उर्मिला कोठारेने शेअर केला दिलखेचक डान्स परफॉर्मन्स

मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. नुकताच उर्मिलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ती खूप पद्धतीने डान्स करताना दिसत आहे.

उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. ती ‘गणनायकाय गणदैवताय’ या गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. (Marathi actress urmila kothare share her dance video on social media)

उर्मिलाने शेअर केलेल्या या डान्स व्हिडिओवर तिचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या व्हिडिओवर फुलवा, ऋतुजा बागवे आणि क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया देऊन तिच्या डान्सचे कौतुक केले आहे. यासोबत तिचे बाकी चाहते देखील या व्हिडिओवर सातत्याने कमेंट करत आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘कांकन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्यासोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

 

 

हे देखील वाचा