हिंदी तसेच मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सध्या सिनेसृष्टीत फारशा दिसत नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र चांगल्याच सक्रिय असतात. यांपैकीच एक अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar). आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री सध्या अभिनय जगतात दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा मराठमोळा साज केलेला फोटो पाहायला मिळत आहे.
उर्मिला मातोंडकर ही हिंदी तसेच मराठी सिने जगतातील एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या उर्मिला मातोंडकर अभिनय जगतात नव्हेतर राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. राज्याच्या राजकारणावर त्या नेहमीच सोशल मीडियावरुन भाष्य करत असतात. अनेकदा उर्मिला मातोंडकर आपल्या राजकीय भूमिका घेऊन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येताना दिसत असतात. मात्र सध्या उर्मिला मातोडकर त्यांच्या वक्तव्यामुळे नाहीतर व्हायरल फोटोमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
हा फोटो अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. फोटोमध्ये उर्मिला मातोंडकरची कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ घातलेला लक्षवेधी फोटो पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावरील तेज आणि त्यावर केलेल्या सुंदर मेकअपने हा फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. फोटोसोबतच उर्मिलाने दिलेले “नाकात नथ, माथ्यावर चंद्रकोर आणि ह्रदयात महाराष्ट्र,” असा भन्नाट कॅप्शन दिला आहे. उर्मिलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नाकात नथ..
माथ्यावर चंद्रकोर आणि ह्रुदयात..
महाराष्ट्र ❤️ pic.twitter.com/gjt8nDaFdC— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 15, 2022
दरम्यान अभिनेत्री उर्मिला मातोडकरने रंगीला, जुदाई, सत्या, मासूम, अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. सध्या ती राज्याच्या राजकारणात सक्रिय असून नुकतीच तिने कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये उर्मिलाला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर अभिनेत्रीने शिवसेना पक्षात प्रवेश केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॉटनेसचा तडका! शरीर झाकण्यासाठी ईशाने वापरला इतका ट्रान्सपरेंट ड्रेस, पाहून चाहत्यांना फुटला घाम
राजकारणात खळबळ माजवायला आलीये हुमा कुरेशी, ‘महाराणी २’चा दमदार टीझर रिलीझ