Monday, June 17, 2024

राजकारणात खळबळ माजवायला आलीये हुमा कुरेशी, ‘महाराणी २’चा दमदार टीझर रिलीझ

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) पुन्हा एकदा राजकारणासाठी सज्ज झाली आहे. नुकताच हुमा कुरेशीच्या आगामी वेब सीरिज ‘महाराणी २’चा टीझर रिलीझ झाला आहे. राजकारणावर आधारित या प्रसिद्ध वेबसिरीजचा पहिला भाग जबरदस्त होता. अशा परिस्थितीत, आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी ‘महाराणी’ सीझन २ चा दमदार डोस आणला आहे.

महाराणीच्या अवतारात परतली हुमा कुरेशी
सोनी लिव्हच्या ‘महाराणी’ या सुपरहिट वेब सीरिजच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर आता या सिरीजच्या दुसरा भाग तयार झाला आहे. खरं तर, ‘महाराणी सीझन २’चा टीझर काही वेळापूर्वी सोनी लाइव्ह ऍपवर रिलीझ झाला आहे. या टीझरमध्ये हुमा कुरेशीचा महाराणी अवतार अप्रतिम दिसत आहे. इतकंच नाही, तर यावेळी हुमा कुरेशी राजकारणाच्या क्षेत्रात खळबळ माजवणार असल्याचे टीझर पाहून स्पष्ट झाले आहे. याशिवाय ‘महाराणी २’च्या या टीझरमध्ये सुहम शाहची झलकही पाहायला मिळणार आहे. (huma qureshi maharani 2 web series teaser released now)

खरं तर, ‘महाराणी २’चा टीझर पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, सीझन २मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री राणी भारती उर्फ ​​हुमा कुरेशी आणि त्यांचे पती बिमा भारती म्हणजेच सुहम शाह यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. ‘महाराणी २’च्या टीझरनंतर चाहते या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, ‘महाराणी २’च्या निर्मात्यांनी अद्याप त्याची रिलीझ डेट जाहीर केलेली नाही. पण ही वेब सिरीज ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा