यावर्षी चित्रपट सृष्टीतून अनेक गोड बातम्या येत आहेत. मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिच्या घरी देखील लवकरच एका लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. नुकतेच तिचे डोहाळेजेवण झाले आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने याआधी देखाल बऱ्याचदा तिचे प्रेग्नेंसीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. याबाबत आता तिने तिचे मत व्यक्त केले आहे.
उर्मिलाने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट केली आहे. तिने लिहिले आहे की, “सगळ्यात जास्त मला हसू एका कमेंटवर आलं. ती म्हणजे, मुळात सतत पोट दाखवून फोटो काढायची आणि सोशल मीडियावर ते टाकायची गरजच काय? मी जर शिक्षिका असते, एखाद्या कंपनीत काम करत असते किंवा छानशा बॅंकेत काम करत असते, तर मी प्रेग्नेंट आहे आणि माझं पोट आता किती मोठं झालंय वा माझा कितवा महिना चालू आहे? हे फक्त माझ्या सहकाऱ्यांना, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, मित्र परिवाराला माहित असतं.”
पुढे ती म्हणाली, “पण मी एक अभिनेत्री आहे, माझं कामंच कॅमेऱ्यासमोरचं आहे. त्यात मी एक कंटेंट क्रिएटर पण आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवून टाकण्याचे मला पैसे मिळतात. माझ्या येणाऱ्या व्हिडिओची, ब्रॅंडसाठीच्या जाहिरातींची, कामांची जाहिरात सोशल मिडीआवर करणं, माझंच कर्तव्य आहे. चित्रपटाप्रमाणे रिलीझ होणाऱ्या गोष्टींचं मार्केटिंग करणारी टीम माझ्याकडे नाही, ते काम मलाच करावं लागतं. मी शूटिंग करताना फक्त माझ्या चेहऱ्याचंच शूटिंग करणं आणि वाढलेल्या पोटाला संपुर्ण लपवणं शक्यच नव्हतं. इतकं सुदृढ शरीर, साथ देणारं पोटातलं बाळ असताना, मी ९ महिने माझं काम सोडून, घरात का बसावं? आणि मुळात इतकी आनंदाची, प्युअर, दिव्य गोष्ट लपवायची कशाला? या संपुर्ण प्रवासात मला माझ्या प्रेक्षकांनी, मंडळींनी भरभरुन साथ दिली. माझं भरभरुन कौतुक केलं. मला याचा आनंद आणि अभिमान दोन्हीही आहे.”
https://www.facebook.com/100053940384046/posts/319458343195509/?d=n
उर्मिलाचे डोहाळेजेवण थाटामाटात पार पडले आहे. तिने सोशल मीडियावरुन हे सगळे फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाउज घातला होता. तसेच लाल रंगाची फ्लोरल ज्वेलरी घातली होती. यामध्ये तिचे रूप खूपच खुलून दिसत होते. उर्मिला मुख्यतः एक यूट्यूबर असल्यामुळे ती नेहमीच तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
उर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. तिने ‘दुहेरी’, ‘एक तारा’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’










