Wednesday, July 3, 2024

वाढदिवस विशेष: ‘पछाडलेला’ मधील दुर्गा मावशीच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या वंदना गुप्तेंचा संघर्षमय प्रवास

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन कितीही काळ लोटला तरी आजही त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. प्रेक्षकांना हे चित्रपट आजही निखळ मनोरंजन करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत.असाच गाजलेला चित्रपट म्हणजे ‘पछाडलेला’. अभिनेता भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले होते. याच चित्रपटातून दुर्गा मावशीची भूमिका साकारुन वंदना गुप्तेंनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.  आज (१६ जून) वंदना गुप्ते यांचा वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्या फिल्मी करिअरबद्दल. 

वंदना गुप्ते या मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी आणि सोज्वळ सौंदर्यासाठी त्या मराठी सिने जगतात विशेष ओळखल्या जातात. प्रत्येक भूमिका साकारताना आणलेला जिवंतपणा आणि त्यासाठी घेतले जाणारी मेहनत यामुळे त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जाते. अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा जन्म १६ जुलै १९९२ रोजी झाला. त्या आता ७० वर्षाच्या झाल्या आहेत. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीने त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वंदना गुप्ते यांनी अनेक नाटके,चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. त्या अनेक हिंदी सिनेमांमध्येही झळकल्या आहेत. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘फोटोकॉपी’, ’66 सदाशिव’, ‘वेल डन बेबी’, ‘डबल सिट’, ‘मातीच्या चुली’, ‘बे दुणे साडे चार’, ‘टाईनप्लीज’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘बकेट लिस्ट’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘व्हॉट्सअप लग्न’, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केलं आहे. यामधील त्यांची पछाडलेला चित्रपटातील दुर्गा मावशीची भूमिका प्रचंड गाजली होती. त्याचबरोबर त्यांची या गोजिरवाण्या घरात मालिकेतील प्रचंड भूमिकाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा