मराठी बिग बॉसचं दुसरं पर्व चांगलंच गाजलं होतं. यासोबत घरातील अनेक स्पर्धक चर्चेत आले होते. यातील एक स्पर्धक म्हणजे वीणा जगताप होय. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामधून वीणा चांगलीच नावारूपाला आली होती. वीणा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तसेच तिचे फोटो ती शेअर करत असते. अशातच वीणाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.
वीणाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, वीणाने लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातलेला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे. यासोबत तिने कानात लाल रंगाचे सुंदर इअरिंग घातले आहेत. केस कर्ली करून तिने केसांना एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या लूकमध्ये एकंदरीत ती खूप सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “किती गोड दिसतीयेस,” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने “नुसती क्यूट आहेस तू,” अशी कमेंट केली आहे. बाकी अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. नुकतेच वीणाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. बहिणीच्या मेहंदी आणि हळदी फंक्शनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले हे फोटो तिच्या बहिणीच्या लग्नातील आहे. (marathi actress veena jagtap’s red lehanga photo viral on social media)
वीणा बिग बॉसच्या घरात असताना तिचे आणि शिव ठाकरेचे अफेअर खूप गाजले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर देखील ते अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले होते. ते सोशल मीडियावर देखील एकमेकांचे फोटो शेअर करत होते, पण मागील अनेक दिवसांपासून एकमेकांचे फोटो शेअर करत नाही. तसेच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पसरत आहेत.
वीणाने ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत काम केले आहे. यासोबत तिने ‘अनन’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!
-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ










