Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड

कलाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी सोमवारी (दि. 24 जुलै) वयाच्या 88व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत. त्यांनी तब्बल 100हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये काम केले होते. तसेच, त्यांची अभिनय कारकीर्द ही 73व्या वर्षापर्यंत सुरू राहिली.

प्रसिद्ध मराठी अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकजण सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

सावरकर यांच्याविषयी थोडक्यात
जयंत सावरकर यांचा जन्म रत्नागिरी येथील गुहागरमध्ये 3 मे 1936 रोजी झाला होता. विशेष म्हणजे, त्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. अनेक काळ त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले होते. त्यांच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 100हून अधिक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांच्या नाटकांमध्ये ‘एकच प्याला’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बदफैली’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ यांचा समावेश आहे. त्यांनी ‘जानकी’, ‘थोरली जाऊ’, ‘इना मिका डिका’, ‘चार दिवस सासूचे’, ‘येड्यांची जत्रा’ यांसारख्या मराठी सिनेमातही काम केले आहे.

याव्यतिरिक्त त्यांनी स्वप्निल जोशी याच्या ‘समांतर’ या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. तसेच, त्यांनी ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये भूमिका बजावल्या आहेत.

हिंदी सिनेसृष्टीतही केलं काम
एवढंच काय, तर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला. जयंत यांनी जवळपास 30 हिंदी सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. त्यांना वास्तव (1999), सिंघम (2011), रॉकी हँडसम (2016) आणि सूर्यवंशी (2021) या सिनेमांतील भूमिकांसाठी विशेष ओळखले जाते.

याव्यतिरिक्त ते 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते. (marathi and hindi film actor jayant savarkar death read more)

महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलीचे वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी दुःखद निधन
“आपलं उत्तरदायित्व समजून…” अभिनेता हार्दिक जोशीने मुख्यमंत्रांच्या ‘त्या’ कृतीचे केले भरभरून कौतुक

हे देखील वाचा