मराठी ‘बिग बॉस ३’ कार्यक्रम विविध कारणांनी प्रचंड चर्चत आला होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा जोरदार तडका पाहायला मिळाला. मात्र या सर्वांमध्ये या पर्वाचा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि विकास पाटीलच्या (Vikas Patil) दोस्तीची सर्वात जास्त चर्चा झाली. भांडणासाठी , एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी विशेष ओळखला जाणारा हा कार्यक्रम विशाल आणि विकासच्या मैत्रीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आता पून्हा एकदा त्यांचा एकत्रित फोटो समोर आला असून त्यांच्या या निखळ मैत्रीची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बिग बॉस मराठी ३ विजेता विशाल निकम सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या विजेतेपदानंतर विशालची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. तो सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत असतो. आपले नवनवीन फोटो तो चाहत्यांशी शेअर करताना दिसतो. तत्पुर्वी बिग बॉसच्या घरात विशाल आणि विकासची चांगलीच मैत्रा जमली होती. कार्यक्रमात दोघांच्याही घट्ट मैत्रीचे अनेक किस्से पाहायला मिळाले होते. त्यांची ही मैत्री कार्यक्रमातून बाहेल पडल्यानंतरही तशीच घट्ट राहिली आहे. अनेकदा ते एकत्र फिरताना दिसत असतात. आता पून्हा एकदा त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे.
हनुमान जयंतीनिमित्त शेअर केलेला हा खास फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.ज्यामध्ये दोघेही मारुती रायाला हात जोडताना दिसत आहेत. या फोटो दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी “आज आम्ही दोघं बऱ्याच दिवसांनी भेटलो ते ही हनुमान जयंतीला त्यामुळे हनुमंताचे आशिर्वाद घेतले आहेत की आमची मैत्री राम-लक्ष्मणा सारखी आयुष्य भर राहावी हीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना” असा भारी कॅप्शन दिला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत असून त्यांच्या या अतुट मैत्रीचे चाहते तोंडभरुन कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-