‘सैराट’, ‘फँड्री’ यांसारख्या प्रसिद्ध सिनेमांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आपला बहुप्रतिक्षित सिनेमा घेऊन येत आहेत. त्यांच्या सिनेमाचे नाव ‘झुंड’ असे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. अशातच मंगळवारी (०८ फेब्रुवारी) त्यांच्या ‘झुंड’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
विशेष म्हणजे या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका आहे. तसेच ‘सैराट’ या सिनेमात झळकलेले मुख्य कलाकार आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे देखील दिसणार आहेत.
नागराज मंजुळे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘झुंड’ या सिनेमाचा टिझर शेअर केला आहे. हा टिझर शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “बडी फिल्म बडे परदे पर.” म्हणजेच “मोठा सिनेमा मोठ्या पडद्यावर.” त्यांच्या या पोस्टवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव पाडत आहेत.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “येत्या ४ मार्च, २०२२ रोजी ‘झुंड’ चित्रपटगृहात तुमच्या भेटीला येणार आहे.”
https://www.facebook.com/1704772843/posts/10209739750926237/?d=n
‘झुंड’ या सिनेमाच्या टिझरला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे सिनेमाची कथा?
‘झुंड’ हा एक बायोग्राफिक सिनेमा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहेत, जो रस्त्यावरील मुलांना फुटबॉल संघ तयार करण्यास प्रेरित करतो.
खरं तर या सिनेमाच्या शूटिंगला २०१८ मध्येच सुरुवात झाली होती. सिनेमा तयार झाल्यानंतर मागील २ वर्षांपासून प्रदर्शनाची वाट पाहत होता. त्यानंतर हा सिनेमा मागील वर्षी १८ जून, २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
विशेष म्हणजे, नागराज मंजुळे हे पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही या बहुप्रतिक्षित सिनेमासाठी खूपच उत्सुक आहेत.
हेही वाचा-