×

अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार की चित्रपटगृहांमध्ये? दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिले उत्तर

आगामी काळात अनेक चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. कोरोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनावर मोठा परिणाम झाला असून, अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले गेले ते काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित कऱण्यात आले. अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ सिनेमासाठी देखील प्रेक्षकांमध्ये खूपच आतुरता दिसून येत आहे. या सिनेमाच्या टिझरला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सर्वच जणं सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट बघत होते, मात्र कोरोनाने एन्ट्री केली आणि सर्वच समीकरणं बदलून गेली. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यावर या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांनी त्यांचे मत दिले आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘झुंड’ (Jhund) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली होती, आणि हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या बातम्यांवर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सांगितले की, “आम्ही हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. माझी सिनेमाची संपूर्ण टीम मला यासाठी खूप मदत देखील करत आहे. आम्ही खूपच गोंधळात आहोत, मात्र ‘झुंड’ हा सिनेमा चित्रपट योग्य वेळेत चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करू.” हा सिनेमा पूर्ण झाला असून, मागील काही काळापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

दरम्यान या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी ‘स्लम सॉकर’चे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारली असून, बिग बी या चित्रपटात प्राध्यपकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ते झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल टीम तयार करण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यांना जगण्याचा उद्देश देतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर (siddharth roy kapur) आणि नागराज मंजुळे (nagraj manjule) यांची मटका किंग (matka king) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १९६० ते १९९० या दशकतील घटलेल्या सत्य घटनांवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे.

हेही वाचा :

Latest Post