Friday, November 22, 2024
Home मराठी आरारा खतरनाक! प्रविण तरडे आणि दाक्षिणात्य सिनेजगताचे बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांची ग्रेट-भेट

आरारा खतरनाक! प्रविण तरडे आणि दाक्षिणात्य सिनेजगताचे बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांची ग्रेट-भेट

सध्या मराठी सिने जगतात एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे देशभरात मराठी चित्रपटांचे कौतुक होताना दिसत आहे. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक ‘मुळशी पॅटर्न’ फेम प्रविण तरडे (Pravin Tarde) यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना प्रविण तरडे आणि त्यांची टीम दिसत आहे. याचदरम्यान प्रविण तरडे यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांंगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते दाक्षिणात्य सिने जगताचे बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत दिसत आहेत. काय आहे ही बातमी चला जाणून घेऊ. 

 

सध्या प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. ठाणे जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष आणि प्रचंड ध्येयवेडे कर्तव्यदक्ष असलेले आनंद दिघे यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट आहे. आनंद दिघे यांच्या भूमिकेतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या अप्रतिम भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तसेच या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशनही होताना दिसत आहे. याचनिमित्ताने प्रविण तरडे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाक्षिणात्य सिने जगताचे दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांची भेट घेवून त्यांच्याच हस्ते या चित्रपटाचा टिजर त्यांच्या हस्ते प्रदर्शित केला आहे.

याबद्दलची प्रविण तरडे यांची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी “एसएस राजामौली बस नाम ही काफी है . धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाचं टिझर त्यांच्या हस्ते लॅान्च झालं. या माणसाने जसं त्याचा प्रादेशिक सिनेमा साता समुद्रापार नेला तशीच घौडदौड माझ्या हातून मराठी सिनेमाची होवो, मराठी प्रेक्षकांची थाप अशीच पाठीवर राहो ,१३ मे २०२२ धर्मवीर सर्वत्र प्रदर्शित” असे लिहीत फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये एसएस राजामौलीही दिसत आहेत. सध्या त्यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा