‘मुळशी पॅटर्न’ फेम ‘पिट्या भाई’च्या वाढदिवसानिमित्त, सहकलाकार आणि मित्र प्रविण तरडेची खास पोस्ट

mulashi pattern fame ramesh pardeshi celebrating his birthday pravin tarde gave him special wishes


साल २०१८ मध्ये एक चित्रपट आला आणि त्याने अवघ्या मराठी सिनेसृष्टीला हादरवून सोडलं. हा चित्रपट आहे ‘मुळशी पॅटर्न’. मराठीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘मुळशी पॅटर्न’ने आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने खूप वाहवा मिळवली. चित्रपटाची अनोखी कथा आणि त्याचे सादरीकरण प्रेक्षकांना विशेष भावले. सोबतच यातील कलाकारांच्या अभिनयाने, त्यांना प्रसिद्धीच्या एका वेगळ्याच स्तरावर नेऊन पोहचवले. याच चित्रपटातील एक अभिनेता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे, ज्याने या चित्रपटात ‘पिट्या भाई’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. तो अभिनेता म्हणजेच रमेश परदेशी होय. सर्व बाजुंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसोबतच आता त्याचे सहकलाकार देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

‘मुळशी पॅटर्न’चा दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे यानेही आपल्या सहकलाकार मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रविणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रविण तरडेसोबत अभिनेता रमेश परदेशीही दिसत आहे. दोघांच्या या फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

दोघांचा हा फोटो शेअर करत प्रविणने कॅप्शनमध्ये, “वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ” असे लिहिले आहे. आता चाहतेही या फोटोवर कमेंट करून, रमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘हॅपी बर्थडे पिट्या भाई’ अशा अनेक कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळत आहेत.

रमेश परदेशीबद्दल बोलायचं झालं, तर तो सिनेसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. ‘मुळशी पॅटर्न’ मधील त्याच्या व्यक्तीरेखेने अनेकांची मने जिंकली. ‘मुळशी पॅटर्न’ व्यतिरिक्त रमेशने ‘देऊळ बंद’, ‘रेगे’, ‘लग्न मुबारक’, ‘अर्जुन’ ‘फत्तेशिकस्त’, ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात काम करून, आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.