Saturday, July 27, 2024

‘महाराष्ट्राला वाचवा…’, तेजस्विनी पंडितचं ‘ते’ ट्वीट चर्चेत, फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गेले चार दिवस उपोषण केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 ऑक्टोबरला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधून महाराष्ट्रातील टोलसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. या टोल पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने टोल दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.

तेजस्विनी पंडितने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, “म्हणजे ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!” तसेच तेजस्विनी पंडितने याप्रकरणी भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

तिच्या या ट्विटला अनेक रिट्विट करण्यात आले आहे. या ट्विटला रिप्लाय देताना एकाने लिहिले की, “उद्या पासून टोल देणे बंद.कोणी विचारलं तर हा व्हिडिओ दाखवा.” दुसऱ्याने लिहिले की, “राज्य मार्ग हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. राष्ट्रीय महामार्गावर केंद्राचं नियंत्रण असतं. तिथे राज्य सरकार काही करू शकत नाही.”

 तेजस्विनी पंडितने टोल दरवाढ रद्द करण्याची मागणी करत सरकारला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर या आठवड्यापर्यंत टोल दरवाढ रद्द झाली नाही तर ती स्वतः टोल भरणार नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. तेजस्विनी पंडितने टोल दरवाढ रद्द करण्याची मागणी केल्याने आता या विषयावर पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (marathi famous actress tejaswini pandit reaction on toll shared video of dcm devendra fadnavis)

आधिक वाचा-
रुपाली भोसलेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले, ‘घोड्याचा लगाम धरून ठेवा, नाहीतर…’
इस्रायलमध्ये झालेल्या युद्धानंतर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उतरली स्वरा; म्हणाली, ‘ती लोक ढोंगी..’

हे देखील वाचा