Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड Death Anniversary | खूपच वेदनादायक होता ‘मंथरा’चा मृत्यू, बंगल्यात कोणीही सोबत नसताना केला देहत्याग

Death Anniversary | खूपच वेदनादायक होता ‘मंथरा’चा मृत्यू, बंगल्यात कोणीही सोबत नसताना केला देहत्याग

‌हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने या क्षेत्रात प्रचंड नाव कमावले, तुफान लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अभिनयाने अवघी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली मात्र इतके असूनही, या कलाकारांच्या शेवटचा काळ मात्र अत्यंत त्रासात आणि दुःखात गेला. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे ललिता पवार (Lalita Pawar). जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल.

ललिता पवार या हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अभिनयाने, सौंदर्याने त्या काळात सर्वांना मोहित केले होते. ललिता पवार यांची गुरूवार (२४ फेब्रुवारी) पुण्यतिथी असते. आपल्या शेवटच्या काळात त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला होता आणि याच आजारात त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे पती सुद्धा नव्हते. कारण ते सुद्धा एका रुग्णालयात उपचार घेत होते. इतकेच नव्हे, तर तीन दिवसांनी ललिता पवार यांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली होती. तोपर्यंत त्यांचा मृतदेह तसाच त्यांच्या रूममध्ये पडून होता.

ललिता पवार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत तब्बल ७०० चित्रपटात काम केले आहे. मात्र त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता ‘रामायण’मधील ‘मंथरा’च्या भूमिकेने मिळाली. त्यांच्या या भूमिकेत इतका जिवंतपणा होता की, लोक खरोखर त्यांना वाईट व्यक्ती समजू लागले होते. त्यांना अजून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवायचे होते. प्रमुख अभिनेत्री व्हायचे होते. मात्र एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि त्यांचा डोळा निकामी झाला. यामुळे त्यांचे स्वप्नही अपूर्ण राहिले.

ललिता पवार यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, मात्र त्यांनी प्रत्येकवेळी त्यातून मार्ग काढत पुन्हा नव्याने आपले आयुष्य जगायला सुरुवात करायच्या. ललिता यांनी दोन लग्ने केली होती. त्यांचे पहिले पती गणपत पवार यांनी त्यांना धोका दिला. गणपत पवार यांचे ललिता यांच्या छोट्या बहिणीशी सूत जुळले. त्यानंतर ललिता पवार यांनी राज प्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पासून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र त्यांना कधीही प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळाली नाही. त्यांच्या सौंदर्याची, अभिनयाची नेहमीच चित्रपट जगतात चर्चा पाहायला मिळाली होती. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटात ‘अनाडी’,’ श्री ४२०’ सारख्या सुपरहीट कलाकृतींचा समावेश आहे.

हे देखील वाचा