Monday, April 15, 2024

‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा टीझर रिलीज

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. 
https://youtu.be/Lh37meIb6I4
टीझरची सुरूवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की! टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी… सुरवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे वाघ’ हा संवाद असो किंवा टीझरच्या शेवटी किरणचा ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’ हा संवाद असो, यावरून असं लक्षात येतंय की अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्वच पातळ्यांवर बाजी मारली आहे.
https://youtu.be/Lh37meIb6I4
चौकच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रविण तरडेंची खास शैली, रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांची वेगळी भूमिका, उपेंद्र लिमयेंचा रांगडा अभिनय, स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे यांच्या संवेदनशील भूमिका आपल्याला चौकमध्ये बघायला मिळतील. तर, किरण गायकवाड चौकमध्ये तरूणाईचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय, चौकच्या निमित्ताने किरण प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसेल. तसेच वेगवेगळ्या बाजूंनी एकाच चौकात आलेले हे सर्व कलाकार आपल्यासमोर नक्की काय घेऊन येत आहेत, हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. टीझरमध्ये वाजणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे देखील हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.
‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा