Sunday, August 3, 2025
Home मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं घडलं! ३ हजार फुटाच्या उंचीवर जाऊन हेलिकॉप्टरद्वारे ‘मजनू’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं घडलं! ३ हजार फुटाच्या उंचीवर जाऊन हेलिकॉप्टरद्वारे ‘मजनू’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमचं ३ हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जाऊन, नुकताच मराठीतील ‘मजनू’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. कलाकार व दिग्दर्शकाच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या प्रसंगी अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण (लागीर झालं टीव्ही सिरीयल फेम), अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोवर्धन दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, “चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमचं ३ हजार फुटाच्या उंचीवर जाऊन चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. याचं उंचीप्रमाणे मराठी चित्रपट जागतिक स्तरावर मला घेऊन जायचा आहे. प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.”

चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू चित्रपट १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्या हा चित्रपट आवडेल.” तसेच ‘मजनू’ चित्रपटात रसिकांना फाईट, !ऍक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा