Wednesday, June 26, 2024

आयफोनवर चित्रित झालेला पाहिला मराठी सिनेमा ‘पाँडिचेरी’ येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत आयफोनची क्रेझ किती आहे हे सांगण्याची गरजच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात आयफोन ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. आता याच आयफोनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता प्रथमच मराठी सिनेसृष्टीत ‘पाँडिचेरी’ या आयफोनवर बनलेला चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची बातमी प्रेक्षकांना मिळताच त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहेत. तिघेही मुख्य भूमिकेत दिसणार असून, आता हे तिघे या सिनेमात काय कमाल दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर देखील स्क्रिन शेअर करणार आहेत.

नुकतीच आता सई ताम्हणकरने या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. आईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली असून, ती सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट करत तिने लिहिले की, “मी तुम्हा सर्वांना थिएटरर्समध्ये खूप मिस केलं आहे. एक खास सिनेमा जो संपूर्णरित्या आयफोनवर चित्रित केला आहे. तो तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तेव्हा भेटूया, थिएटरमध्ये येत्या २८ फेब्रुवारीला.”

यावरून हे लक्षात येते की, हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘पाँडिचेरी’ हा आयफोनवर बनलेला चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी केले आहे. सई आणि वैभवची जोडी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे सई ताम्हणकर वैभव तत्ववादी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. सईबद्दल बोलायचे झाले, तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्याचबरोबर ती चाहत्यांबरोबर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. ज्यामुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनत असते.

हेही वाचा

हे देखील वाचा