Friday, July 12, 2024

सून करिनाच्या ‘क्रू’ चित्रपटाचे शर्मिला टागोर यांनी केले कौतुक; म्हणाली, ‘महिला एकतेची सुंदर कथा…’

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila tagore) या अभिनेता सैफ अली खानच्या आई आणि करीना कपूरच्या सासू आहेत. शर्मिला अनेकदा तिची सून करीना कपूरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. सासू आणि सून या दोघींमध्ये एक चांगला बॉन्ड पाहायला मिळतो. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान शर्मिला टागोर ‘क्रू’ चित्रपटाचे कौतुक करताना दिसल्या आहेत.

जेव्हा शर्मिला टागोरला विचारण्यात आले की तिला करीना कपूरचा ‘क्रू’ चित्रपट कसा आवडला? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “खरं सांगायचं तर हा चित्रपट इतका जबरदस्त असेल यावर मला आधी विश्वासच बसत नव्हता. मला या चित्रपटाची कथा सर्वात जास्त आवडली. तीन महिला एकमेकांना मदत करत आहेत. एक विमान उडवत आहे आणि दुसरा ते उतरण्यास मदत करत आहे. या चित्रपटाने ती कथा खोटी ठरविली ज्यात महिलाच महिलांच्या शत्रू आहेत असे म्हटले आहे.”

शर्मिला टागोर पुढे सांगतात, ‘चित्रपटात तीन महिलांनी एकत्र काम करण्याची कल्पना मला आवडली. हा चित्रपट पाहिल्यानंतर असे आणखी चित्रपट बनवायला हवेत असे वाटले. ‘क्रू’चे बॉक्स ऑफिसवरील यश पाहून अधिकाधिक निर्माते-दिग्दर्शकांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून असे चित्रपट बनवले तर बॉलीवूडमध्ये बदल पाहायला मिळेल.” ‘क्रू’ चित्रपटात करीना कपूरशिवाय तब्बू आणि क्रिती सेनन दिसल्या होत्या. सूत्रांवर विश्वास ठेवला तर या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.

महिलाकेंद्रित चित्रपटांबद्दल बोलताना शर्मिला टागोर म्हणतात, ‘मलाही किरण रावचा ‘लपता लेडीज’ चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कमाल केली. अशा चित्रपटांना पाठिंबा मिळाला पाहिजे. याशिवाय मला दीपिका पदुकोणचा ‘पिकू’ चित्रपटही आवडला. महिलांना केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक चित्रपट बनवायला हवेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

करीनाने वाढदिवसानिमित्त करिश्मावर केला प्रेमाचा वर्षाव; फोटो शेअर करत लिहिले, ‘तू माझ्यासाठी हिरो आहेस…’
भन्साळींसोबतच्या मतभेदांवर नाना पाटेकरांचे वक्तव्य; म्हणाले, ‘नाते कामापेक्षा जास्त असावेत’

हे देखील वाचा