Saturday, June 29, 2024

दोन ‘सिंगल’ मिळून करणार सुपर धमाल; अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? एकदा नक्की वाचा

‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे.

असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याचं उत्तर 3 नोव्हेंबरला चित्रपटगृहात मिळणार असून त्यासाठी प्रथमेश आणि अभिनय या जोडीचा ‘सिंगल’ (Singal) हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत.

हा एक धमाल चित्रपट असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय काय करामती करतो याची गंमत पहायला मिळणार आहे. पोरीपायी दोस्तीत कुस्ती होईल की प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा ‘सिंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करेल असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करतात. या दोघांसोबत या चित्रपटात रमेश परदेशी, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, सुरेश विश्वकर्मा आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

आधिक वाचा-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम सर्वांच्या मनावर राज्य करणारा मोहसिन खान; वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी
सलग 3 फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर रणवीर गेला होता खचून, म्हणाला, ‘मी खूप सहन केले’

हे देखील वाचा