अभिनेता अभिनय बेर्डेच्या ‘मन कस्तुरी रे’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Actor Abhinay Berde's movie 'Man Kasturi Re' Shooting Complete


रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे अशी माहिती दिली. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक संकेत माने हे आहेत, तर सुमित गिरी यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट एँड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे. सध्या या सिनेमातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दुजोरा देताना सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक संकेत माने म्हणाले, “कोरोना काळात अतिशय सावधानता बाळगून ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले होते. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच सिनेमा आहे. तसेच अभिनय बेर्डे हा गुणी अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव अप्रतिम होता. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईमधील लालबाग, भांडूप, ठाणे, मिरारोड अशा लाईव्ह लोकेशनवर करण्यात आले. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांच्या सोबतचे अनुभव अविस्मरणीय होते. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला उत्सुक आहोत.”

अभिनेता अभिनय बेर्डे चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल सांगतो, “लेखक-दिग्दर्शक संकेत माने यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. स्वत: च्या अभिनयावर अभ्यास करता आला. तसेच सिनेमाची गाणी चित्रीत करताना मी खूप एन्जॉय केलं. मुंबईतल्या लाईव्ह लोकेशनवर चित्रीकरण करतानाचा अनुभव अविश्वसनीय होता.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-


Leave A Reply

Your email address will not be published.