सध्या मराठी टेलिव्हिजनवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मालिकेला मिळताना दिसत होता. मालिकेतील अंतरा मल्हारचे लग्न झाले असले तरी मल्हारचा अंतरावरील राग आणि तिरस्कार काही कमी होत नव्हता त्यामुळे प्रेक्षकांना त्यांची ही लवस्टोरी कधी जुळणार याचीच उत्सुकता लागली होती. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपत आली नसून मल्हार लवकरच अंतराला त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे, ज्याचा प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिका घराघरात लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. असे असले तरी मालिकेत सर्वाधिक चर्चा होते ती अंतरा आणि मल्हारच्या लवस्टोरीची. मालिकेमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौघुले तर अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारत आहे. मालिकेत पहिल्यापासूनच उद्योजक असलेला मल्हार आणि अंतरामध्ये छत्तीसचा आकडा असल्याचे दाखवले आहे. सतत भांडण, राग, यामुळे मालिकेत त्यांच्या नात्यात कायमच कटूता दाखवली आहे. प्रेक्षकांनाही त्यांचा हा दुरावा संपूण कधी प्रेम खुलणार असा प्रश्न पडला होता. त्यांची ही प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे.
View this post on Instagram
‘जीव माझा गुंतला’ मालिकेत अलिकडेच अंतरावर अज्ञातांनी हल्ला केला होता. यावेळी मल्हारने अंतराची खूपच काळजी घेतली. या हल्ल्यातूनही त्याने तिला वाचवले होते. त्यामुळेच मल्हारच्या मनात अंतराबद्दल प्रेमाची भावना जागृत झाली असून तो लवकरच त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. लवकरच प्रेक्षकांना अंतरा आणि मल्हारची जबरदस्त रोमॅंटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. आता एपिसोडची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा –
दोन लग्न अयशस्वी झाल्यावर ‘अशी’ जमली विद्या बालनशी जोडी, वाचा सिद्धार्थ रॉय कपूरची लाईफ स्टोरी
आता शोध मोहीम चालू!, ‘बॉईज ३’ च्या मोशन पोस्टरमध्ये दिसणारी ‘ती’ बोल्ड अभिनेत्री नक्की कोण?
बाण नजरतला घेऊनी अवतरली सुंदरा! रिंकूच्या घायाळ करणाऱ्या अदांनी नेटकऱ्यांना लावले वेड