Thursday, March 28, 2024

आता शोध मोहीम चालू!, ‘बॉईज ३’ च्या मोशन पोस्टरमध्ये दिसणारी ‘ती’ बोल्ड अभिनेत्री नक्की कोण?

सध्या मराठीतील अनेक चित्रपटांच्या सिक्वेल स्टोरी पाहायला मिळत आहेत. ‘टाईमपास’ आणि ‘दे धक्का’ नंतर आता आणखी एका चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो चित्रपट म्हणजे ‘बॉईज ३’. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’या चित्रपटांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल आणि मस्ती तिपटीने घेऊन बॉईज ३ चित्रपट येत आहेत. ढुंग्या, धैर्या आणि कबीर या त्रिकोणाची मस्ती आपल्याला पुन्हा एकदा सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. अशातच ‘बॉईज ३’ (boys 3) चे मोशन पोस्ट नुकतेच समोर आले आहे. सोशल मीडियावर देखील हे पोस्टर व्हायरल होत आहे.

या पोस्टर मध्ये ढुंग्या, धैर्या आणि कबीर सोबत एक मुलगी दिसत आहे. परंतु त्या मुलीचा चेहरा समोर आला नाही. अत्यंत हॉट आणि बोल्ड अंदाजात ती दिसत आहे. परंतु आता सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे की, मराठीतील ती हॉट आणि बोल्ड अभिनेत्री नक्की कोण?

 

बॉईज आणि बॉईज २ मध्ये आपण या तिघांच्या आयुष्यात अनेक मुली आलेल्या पहिल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी कबीर तिच्या प्रेमात पडतो आणि ढुंग्या आणि धैर्या त्याला मदत करत असतात. परंतु आता या चित्रपटात नक्की काय होणार आहे. यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवधूत गुप्ते प्रस्तुत बॉईज ३ चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तसेच लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. बॉईज ३ हा चित्रपट येत्या १७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

‘माझे प्रेम नव्हतेच ती मला फुकटात मिळाली’, सुदेश लहरीचा पत्नीबाबत मोठा खुलासा

Birthday | युविका चौधरीने शाहरुख खानसोबत केलीय स्क्रीन शेअर, तर ‘बिग बॉस’च्या घरात मिळालं तिला खरं प्रेम

हे देखील वाचा