Friday, July 5, 2024

मंडळी, ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिमन्यूच्या रिअल लाईफ ‘लतिका’ माहितीये का? पाहा फोटो

कलर्स वाहिनीवरील मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरलेली दिसत आहे. लठ्ठ परंतू मनाने गोड आणि कर्तृत्ववान असलेल्या मुलीची आणि अभिमन्यू नावाच्या तिच्या पतीची ही कथा सध्या लोकांना प्रचंड आवडलेली आहे.

या मालिकेतील नायक अभिमन्यू आणि नायिका लतिका यांची जोडी त्यामुळेच कमालीची लोकप्रिय झालेली आहे. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर असून त्यात आता पुढे काय घडणार यासाठी तुम्हाला ती मालिका पहावी लागेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे याच्याबद्दल आणि त्याच्या आयुष्यातील खऱ्या लतिकाबद्दल सांगणार आहोत.

पहिली गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’तील अभिनेता अभिमन्यू अर्थात समीर हा विवाहित आहे. शॉक बसला ना, पण हे खरं आहे. त्याच्या पत्नीचे नाव अनुजा असे आहे.

मैत्री ते प्रेम….

अनुजा ही समीरची मैत्रीण होती. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली आणि दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी समीर आणि अनुजा यांनी लग्न केले.

समीर हा जरी आज अभिनेता असला तरीही त्याची पत्नी म्हणजे अनुजा हीचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. अनुजासोबतचे अनेक फोटो अभिमन्यू त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करत असतो.

सुरूवातीला समीरने ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा अभिनय केला. मात्र, या छोट्या रोलपासूनच समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र-२ या मालिकेत त्याने नायकाची भूमिका साकारली.

भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या क्लास ऑफ 83 मधून समीर आता सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत नायकाच्या भूमिकेत काम करत आहे.

हे देखील वाचा