Wednesday, January 14, 2026
Home मराठी अर्रर्र! ‘या’ अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला ठोकला रामराम

अर्रर्र! ‘या’ अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला ठोकला रामराम

मराठी मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली‘ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकला आहे. याची माहिती अभिनेत्रीने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री…

टीव्हीवरील प्रसिद्ध मराठी मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) या मालिकेत नंदिनी हे पात्र साकारणारी अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) ही मालिका सोडत आहे. त्यामुळे आता नंदिनी हे पात्र मालिकेतून बाहेर पडणार आहे.

अदितीची पोस्ट
अभिनेत्री अदिती द्रविड हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने मोठी पोस्टही लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मित्रांनो, ‘सुंदरा मनामधे भरली’मधून नंदिनीला निरोप देत आहे. बाय-बाय नाशिक… फार सुंदर वाटलं. अनमोल आठवणी, चांगले क्षण, आणि अद्भुत लोकांसाठी धन्यवाद! लवकरच भेटूयात नवीन रुपात. तोपर्यंत तुमच्या अखंड प्रेमाबद्दल इंस्टाग्राम परिवाराचे आभार. तुम्ही लोक माझ्यासाठी जग आहात.”

अदितीच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चाहते तिला विचारत आहेत की, ती कुठे चालली आहे. तसेच, काहीजण तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देत आहेत. एका चाहतीने कमेंट करत म्हटले की, “नंदिनी खूप गोड होती, कायम लक्षात राहील!! तुझा अभिनय छानच आहे, अप्रतिम निभावलंस तू ते पात्र!!” तसेच, या चाहतीने अभिनेत्रीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

अदितीने शेअर केलेल्या व्हिडिओत सुरुवातीपासून ते मालिकेचा शेवट करेपर्यंतच्या आठवणी फोटो आणि व्हिडिओतून दाखवल्या आहेत. आता अभिनेत्रीची ही पोस्ट भलतीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्रीने एवढा मोठा निर्णय का घेतला, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. (marathi serial sundara manamadhe bharali fame this actress leave the serial)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील अभिनेत्याचा गंभीर अपघात; पाहा व्हायरल फाेटाे
वय फक्त आकडा! आजीबाईंनी 93व्या वर्षी लावले ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ गाण्यावर ठुमके, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा