Sunday, May 19, 2024

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील अभिनेत्याचा गंभीर अपघात; पाहा व्हायरल फाेटाे

स्टार प्रवाह वाहिनीवरील लाेकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असाे’ यामध्ये युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकर याने आपल्या रावडीपणाने आणि बिनधास्तपणाने चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले. अशातच विजयबाबत एक धक्कादायक बातमी समाेर येत आहे. अभिनेता विजय याचा अपघात झाला असून अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. याचा खुलासा स्वत: अभिनेत्यानं केला आहे. 

अभिनेता विजय आंदळकर (vijay andalkar) याचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहतावर्ग असून ताे साेशल मीडियावर कायमच सक्रीय असताे. अलीकडेच अभिनेत्यानं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टाेरी शेअर केली आहे. या स्टाेरीमध्ये त्यानं अपघात झाल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्याने त्याचा एक जखमी फाेटाेही शेअर केला आहे. या फाेटाेमध्ये त्याच्या हाताला चांगलेच खरचटल्याचे दिसत आहे.

vijay-andalkar
Photo Courtesy: Instagram/vijayandalkar

माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेता नेहमीप्रमाणे शूटींग संपवून आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या हाताला भयंकर खरचटले आहे. तसेच अभिनेत्याला इतर ठिकाणीही मार लागला आहे. अभिनेत्याच्या अपघाताची माहिती मिळताच विजयच्या चाहत्यांनी तसेच कलाकारांनी त्याला काळजी घेण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Arun Andalkar (@vijayandalkar)

या अपघातातून विजय थाेडक्यात बचावल असला तरी काही दिवस डाॅक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अभिनेता काही दिवस मालिकेतून विश्रांती घेणार असल्याचे बाेलले जात आहे, पण अद्याप याबाबत काेणतीही अधिकृत माहिती समाेर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Arun Andalkar (@vijayandalkar)

अभिनेता विजय आंदळकर याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या दमदार मालिकेत काम केले हाेते. (marathi serial pinki cha vijay aso actor vijay andalkar accident get injury)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे आवर भावा! कियारासमोर प्रायव्हेट पार्टबद्दल ‘हे’ काय बोलून गेला शाहिद, व्हिडिओ पाहाच

‘अरे तुमच्या ताटात जेवण नाहीये…’, शाहरुखच्या ‘पठाण’ला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली प्रसिद्ध अभिनेत्री

हे देखील वाचा