मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते. ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’मधून नावारुपाला आलेली आर्या खूपच सुंदर दिसते. तिच्या अदा पाहून कोणीही स्वतःला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत नाही. अशातच लाखोंना भुरळ घालणारे तिचे काही फोटो समोर आले आहेत.
आर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने कार्पोरेट लूक केला आहे. तिने काळ्या रंगाचे ब्लेझर आणि काळ्या रंगाची ट्राउसर परिधान केले आहे. यावर तिने हिल्स घातले आहे, तर कार्पोरेट मेकअप केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटो काढले आहेत. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
खरतर तिचा हा लूक सारेगामापा या शोमधील आहे. आर्या सध्या झी मराठीवरील ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे परीक्षण करत आहे. ज्या शोने तिला ओळख निर्माण करून दिली, आज त्याच शोचे परीक्षण करणे ही आर्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. या शोमध्ये तिच्यासोबत रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा भगवान, प्रथमेश लघाटे हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. (marathi singer aarya ambekar’s carporate look viral on social media)
आर्याने मराठी संगीत क्षेत्राला अनेक गाणी दिली आहेत, तिने ‘जरा जरा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कितीदा नव्याने’, ‘ओ साजणा’ यासारखी गाणी गायली आहेत. यासोबतच तिने अनेक मालिकांचे टायटल सॉंग्स गायले आहेत. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ