Saturday, January 17, 2026
Home मराठी बुरुम बुरुम! ‘महाराष्ट्रातली पहिली बुलेट…’, Royal Enfield ने अवधूत गुप्तेची ‘ती’ विनंती केली मान्य

बुरुम बुरुम! ‘महाराष्ट्रातली पहिली बुलेट…’, Royal Enfield ने अवधूत गुप्तेची ‘ती’ विनंती केली मान्य

मराठी सिनेसृष्टीमधील आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध अभिनेता अवधूत गुप्ते, आपल्या गाण्यांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अवधूतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे गायक चर्चेत आला आहे.

अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) याने मराठी इंडस्ट्रीला अनेक गाजणारे गाणे दिले आहेत. आपल्या दमदार गायिकेने अवधूतने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आज (दि, 26 जानेवारी) रोजी भारतामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहेत. तर अशातच अवधूतने भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहुर्तावर नवीन बुलट खरेदी केली आहे. त्याबद्दल त्याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

अवधूतने सोशल मीडियाद्वारे नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. अशात त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अवधूत रॉयल इन्फिल्डची नवीकोरी बुलेट खरेदी करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्याला voyage motors ची महाराष्ट्रातील पहिली बुलेट मिळाली आहे. त्याशिवाय त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मित्रा.. तुला प्रजासत्ताक दिनाच्या ???????? हार्दिक शुभेच्छा!! बघ मला ह्या शुभमुहूर्तावर काय गोड बक्षिस मिळालंय!! @royalenfield ने #supermeteor650 चं बुकिंग ओपन करताच मी बुकिंग केलं आणि @voyagemotorsre ला गळ घातली की, महाराष्ट्रातली पहिली #bullet मला हवी!! आणि गंमत बघ.. #royalenfield ने सुद्धा माझी प्रेमाची विनंती मान्य केली!! ‘बुरुम बुरुम‘ ला मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे, असं मी मानतो! थॅंक्यू @royalenfield आणि थॅंक्यू @voyagemotorsre !! #thankyou @sidlal #jaihind #jaimaharashtra.”

 

View this post on Instagram

 

अवधूतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याशिवाय अवधूतच्या व्हिडिओवर त्याचे चाहते देखिल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. गेल्या काही दिसांपूर्वी अवधूतने एका कार्यक्रमात सांगितले होते की, तो लवकरच राजकारणात उतरणार आहे. तो फक्त 5 वर्षाच्या कालावधीसाठी तो राजकारणात असणार आहे. पण अद्याप त्याेन सांगितले नाही की, तो कणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या अथिया आणि केएल राहुलला मिळाल्या लग्नानिमित्त भेटवस्तू
सुंदरतेची खान! श्रद्धा कपूरच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

हे देखील वाचा