मुलगी कोणतीही असो तिच्या आयुष्यात एकदा तरी प्रेमाविषयी अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. अनेकदा मुलींसोबत शाळेत जात असताना वाईट प्रसंग घडत असतात. असाच एक प्रसंग अभिनेत्री सुरभी भावेसोबत घडला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री सुरभी भावेने आपल्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. या आठवणींमध्ये तिने छेडखोरांना दिलेला चोप याचाही उल्लेख केला आहे.
सुरभी भावेने (surabhi bhave) नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, तिने आतापर्यंत चार मुलांना छेडखोरी केल्याबद्दल चोप दिला आहे. तिने हा चोप राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत मिळालेल्या प्रशिक्षणामुळे दिला असल्याचे सांगितले.
सुरभीने सांगितले की, “तिने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गुहागरमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा आहे. या शाळेत राहणारी मुले हॉस्टेलमध्ये राहतात. तिथे त्यांना अभ्यासाबरोबरच स्विमिंग, योगा, रायफल शूटिंग, कराटे अशा गोष्टींचंही प्रशिक्षण दिलं जातं.या शाळेच्या पहिल्या बॅचची मी पास आऊट आहे.”
तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कुणाला सांगून खरं वाटणार नाही. पण मी सैनिकी शिक्षण घेतलं असून आजवर छेड काढणाऱ्या 4 पोरांना धुतलंय. पण हे सगळं शिकत असताना माझ्यातले अभिनय गुण हेरले ते माझ्या सैनिकी शाळेतील शिक्षकांनी आजचा व्हिडिओ माझ्या शाळेतल्या वेगळेपणा बद्दल आहे.” सुरभी भावेच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक लोकांनी तिच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.
सुरभी भावे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. सुरभी ही एक बेधडक आणि स्पष्टवक्ते अभिनेत्री आहे. ती नेहमीच समाजातील विविध विषयांवर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. (Marathi Television actress surabhi bhave reveales she had fight with four men who tried to harrass)
आधिक वाचा-
–कौतुकास्पद! गुरमीत चौधरीने केलेल्या मदतीमुळे रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव, व्हिडीओ व्हायरल
–धक्कादायक! दिल्लीच्या मेट्रोत ‘बॉबी’ने प्रवाशाला केली शिवीगाळ, मारहाण अन्…; पाहा व्हिडिओ