बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक बॉबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये बॉबीचे एका प्रवाशासोबत भांडण झाले. बॉलीवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीने दिल्लीच्या मेट्रोमध्ये दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये बॉबीचे एका प्रवाशासोबत भांडण झाले. आता त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये बॉबी एका पुरुष प्रवाशासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.
व्हिडिओनुसार, सीआयएसएफचे जवानही परिस्थिती हाताळताना आणि दोघांमधील भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडिओ शेअर करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, “कलेश उर्फ बॉबी डार्लिंग (Bobby Darling ) आणि एका मुलाने दिल्ली मेट्रोमध्ये एका छोट्या गोष्टीवरून गोंधळ घातला.” मेट्रो हे मनोरंजनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, असे नेटिझन्सने व्हिडिओवर म्हटले आहे. आणखी एकाने लिहिले की, “ती चित्रपटात यायची नाही का?”
दिल्ली मेट्रो प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून, अभिनेत्रीला अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या घटनेमुळे बॉलीवूडमधील दादागिरीच्या आरोपांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. अनेकांनी या घटनेवर टीका करत, बॉलीवूडमधील लोकांना कायदेशीर चौकटीत राहण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या अभिनेत्रीची ओळख बॉबी म्हणून झाली आहे.
Kalesh b/w Bobby Darling and a Guy inside Delhi metro over little issue pic.twitter.com/M1H0LmyKu5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 5, 2023
बॉबीने बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तिला मोठे यश मिळाले नाही. बॉबीने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, बॉबीने तिच्या हातात एक व्हाईट कलरची बॅग पकडलेली आहे. एक व्यक्ती ती बॅग ओढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी सीआयएसएफ जवान ती भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासगळ्यात बॉबी त्या व्यक्तीला खूपच शिव्या आणि मारताना दिसत आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. (Bollywood actress Bobby Darling assaulted a passenger in Delhi Metro)
आधिक वाचा-
–प्रिया बापट अन् उमेशचे लिपलॉक फोटो व्हायरल; लोक म्हणाले, ‘कामत जोडी म्हणजे…’
–कौतुकास्पद! गुरमीत चौधरीने केलेल्या मदतीमुळे रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव, व्हिडीओ व्हायरल