आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीने प्रेक्षकांवर भुरळ घालणारी मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही सतत चाहत्यांचे लक्ष वेधत असते. कधी आपल्या धमाकेदार लावनीने तर कधी चित्रपटांमुळे सतत चर्चेत असणारी अमृता पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवणारी आमृता यावेळेस तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिला ओळखले जाते. अमृता सतत आपल्या नवीन चित्रपटांमुळे आणि डान्समुळे प्रेक्षकांच्या नजरेत असते. मात्र, यावेळेस कारण वेगळे आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर ओटीटी सोहळ्यात अमृताने हजेरी लावली होती. याच दरम्यान तिने खूप ग्लॅमरस मेकअप केला होता त्याशिवाय तिने गुलाबी रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असे कपडे परिधान केले होते. त्यासोबतच तिने गळ्यामध्ये चैन घालून लूक कंपलिट केला होता. विशेष म्हणेज तिने शोभून दिसणारी हेअरस्टाइलही केली होती.
अमृताने परिधान केलेला ड्रेस मात्र, नेटकऱ्यांच्या नजरेस खटकला आहे. त्यामुळे तिला ट्रोल करणयास सुरुवात केली आहे. त्याशिवाय तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चात्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “काय ताई मराठी संस्कृती जपा की जरा, गरीबसुद्धा अंग झाकायला मागे पुढे करत नाही आणि जास्त पैसा आल्यावर एवढा भिकारडेपणा …” तर दुसऱ्याने लिहिले की, “ताई तुम्ही चांगली कलावंत आहात. तुम्हाला असे कपडे घालने शोभत नाही.” अशाप्रकारे काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या ‘चंद्रा’ (Chandra) चित्रपटचाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. यानंतर तिने कलर्सवरील ‘झलक दिख लाजा’ या कर्यक्रमामध्येही सहभागी झाली होती. त्यामध्ये तिच्या धमाकेदार लावणीने आणि डान्सने क्रेज निर्माण केली असून सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बेशरम रंग’ गाण्यावर शेवटी हनी भाऊ बोललाच! ‘पूर्वी स्वातंत्र्य होते….
‘या’ दोन अभिनेत्यांनी ‘नायक’ला होकार दिला असता, तर अनिल कपूरांचा झाला असता पत्ता कट










