सेलिब्रिटींची मुले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात. मग त्यांचे लग्न असो किंवा कुणी त्यांच्यावर टीका केली असो, ते माध्यमांमध्ये येतात. असेच काहीसे भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलीसोबत घडले. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
झाले असे की, गुरुवारी (१८ फेब्रुवारी) आयपीएल २०२१ चा लिलाव पार पडला. यामध्ये सचिनचा मुलगा म्हणजेच साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरचाही समावेश होता. अर्जुनला मुंबई इंडियन्स संघाने त्याची मूळ किंमत २० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. त्याच्यावर इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. याचबरोबर अर्जुनवर नेपोटिझमचाही आरोप लावला होता.
अर्जुनवर लावलेल्या या आरोपांनंतरही त्याची बहीण सारा तेंडुलकरने त्याला पाठिंबा दिला आहे. साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावाचे समर्थन केले आहे.
साराने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अर्जुनसाठी लिहिले की, “कोणीही तुझ्याकडून हे यश हिसकावू शकत नाही. हे केवळ आणि केवळ तुझे आहे.” या पोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/Shinde25sneha/status/1362468027409653761
साराचे वय २३ वर्ष असून ती लंडनमधून शिक्षण घेत आहे. सारा आणि तिचा भाऊ अर्जुनमध्ये खूप चांगलं नातं आहे.
इतर सेलिब्रिटी स्टारकिड्सप्रमाणे सारालाही सोशल मीडियावर सक्रिय राहणे खूप आवडते. सारा नेहमी आपले आणि आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
साराला इंस्टाग्राम अकाउंटवर १.२ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.
साराच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक हटके अंदाजातील फोटो आहेत.
साराचे फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, तिला प्रवास करायला खूप आवडतो. सोबतच तिला फॅशनचीही चांगली समज आहे.
तिच्या कारकीर्दीविषयी बोलायचे झाले, तर आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की, आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सारा कोणत्या क्षेत्रात आपली कारकीर्द बनवायची आहे.
परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की, सारा आपल्या सुंदरतेने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दक्षिण भारतीय लूक अन् कपाळावर टिळा, अभिनेत्री सनी लिओनी दिसतेय एकदम झक्कास; पाहा फोटो
-मौनी रॉयने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील बोल्ड फोटो; सुंदरता पाहून चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
-स्विमिंग पूलमध्ये सनबाथ घेतानाचे दिशा पटाणीचे बिकनीतील फोटो झाले व्हायरल, पाहा ‘ते’ खास फोटो










