मराठी टेलिव्हिजनवर तसेच चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका निभावून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होय. मयुरीने झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचा अभिनय सर्वांना खूप आवडला होता. तिच्या निरागस हास्याने आणि स्वभावाने सर्वांनाच वेड लावले होते. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. या मालिकेची कहाणी देखील सर्वांनाच आवडली होती. मयुरीचे सोशल मीडियावर खूप जास्त फॅन फॉलोविंग आहे. तिचे फोटो मोठ्या संख्येने पसंत केले जातात. मयुरी ही टेलिव्हिजनवरील एक लक्षवेधी अभिनेत्री आहे. अशातच तिच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे.
मयुरीने नुकतेच ‘इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड २०२१’ हा सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यात तिने ‘द मोस्ट व्हर्सटाईल एक्टरेस ऑफ इंडियन टेलिव्हिजन’ हा पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे तिने पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे की, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. (mayuri dehsmukh win the most varstile actress of indian television award, photos get viral)
मयुरीने या सोहळ्यामधील तिचे काही सुंदर फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हातात ट्रॉफी घेतलेली दिसत आहे. तिने मरून रंगाचा ड्रेस घातलेला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने केवळ हार्ट इमोजीचे कॅप्शन दिले आहे. तिचे अनेक चाहते तसेच कलाकार या फोटोवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. या बातमीने तिचे सगळे चाहते देखील खूप खुश झाले आहेत.
मयुरीने अगदी मोजक्याच चित्रपटात काम केले आहे, व त्यातून सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तिने ‘३१ दिवस ‘, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे. तसेच तिचे ‘ग्रे’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे दोन आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’