Tuesday, October 14, 2025
Home मराठी ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेत होणार ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेत होणार ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री

स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाले आहे. या मालिकेत एक कुटुंब कसे एकजुटीने राहतं हे दाखवण्यात येत आहे. यामुळेच प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात. ही मालिका नेहमीच टॉप १० मध्ये राहिली आहे. अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अगदी भुरळ घातली आहे. आता या मालिकेबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अशी भुरळ घातली आहे की, या मालिकेबद्दल कोणतीही माहिती समोर येताच ते जाणून घेण्यास उत्सुक असतात. या मालिकेत सध्या काय सुरू आहे हे देखील अनेक प्रेक्षक बातम्याद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आता या मालिकेचा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे या मालिकेत अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिची एन्ट्री झाली आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य अभिनेत्री राधिका हिच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे ही अभिनेत्री आता कोणालाच नवीन नाही. तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत श्वेता मेहेंदळे (Shweta Mehendale) मालिकेतील अंजी या पात्राच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर श्वेता मेहेंदळेचे काही फोटो देखील समोर आले आहेत. ज्यात तिचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेले देखील दिसत आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम करताना अभिनेत्रीचे वजन या फोटोंच्या तुलनेत जास्तच होते. या फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत असून तिचे ट्रान्सफॉर्मेशन देखील पाहण्यासारखेच आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील तिचा लूक आल्यामुळे चाहते देखील खुश होणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री बऱ्याच दिवसानंतर या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा