Thursday, July 18, 2024

Video | अर्जुन कपूरला सोडून मलायका अरोरा करतीये शिव ठाकरेसोबत रोमान्स

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे तिन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीतीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सगळ्यांना माहित आहे की, शिवएक खूप चांगला डान्सर आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो एका खास व्यक्तीसोबत डान्स करताना दिसत आहे. ती म्हणजे बॉलिवूड क्वीन मलायका अरोरा सोबत तो रोमान्स करताना दिसत आहे.

सगळ्यांना माहित आहे की, शिव एक खूप चांगला डान्सर आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो एका खास व्यक्तीसोबत डान्स करताना दिसत आहे. ती म्हणजे बॉलिवूड क्वीन मलायका अरोरासोबत तो रोमान्स करताना दिसत आहे.

शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो अभिनेत्री मलायका अरोरासोबत रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘अजब सी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ज्यात दोघेही रोमँटिक अंदाजात त्याच्या पायावर बसलेली दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है.” या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मलायकाने पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तसेच त्यावर तिने चॉकलेटी रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच शिव ने देखील काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि चंदेरी पँट परिधान केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ अनेकांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच त्यांच्या या पोस्टला प्रतिसाद देत आहेत.

शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीणाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच वीणाने तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू देखील हटवला आहे.

या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :
मलायका अरोराने अशाप्रकारे केला सांभाळले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य, मातृदिनी केला खुलासा
लहानपणी आई-वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख सहन करणारी मलायका अरोरा म्हणाली, ‘माझे आयुष्य कधीच सोपे नव्हते’

हे देखील वाचा