प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांची मुख्य भूमिका असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका नुकतीच संपली. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड याच उक्तीप्रमाणे मालिकेचा शेवटही गोडच झाला. ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली. मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. सप्टेंबरमध्ये मालिका संपणार होती मात्र लोकाग्रहाखातर ही मालिका अजून काही महिने वाढवली गेली आणि मग जानेवारीमध्ये संपली. मालिकेतील नेहा, यश, परी, समीर, शेफाली आदी सर्वच भूमिका आपल्याशा झाल्या आहेत. कलाकारांनी देखील त्याच्या भूमिका उत्तम पार पडला. आता ही मालिका संपल्यामुळे अनेक फॅन्स हिरमुसले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते मालिका पुन्हा सुरु करण्याची देखील मागणी करताना दिसत आहे.
View this post on Instagram
त्यातच आता मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदेने नवी घोषणा केली आहे. श्रेयसने आपली रेशीमगाठ कधीच तुटणार नसल्याचे सांगितले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यासोबत “शो संपतोय….आपलं नात नाही….आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??” असे लिहिले आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालिकेचा शेवटचा सीन शूट झाल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला त्यानंतर या मालिकेच्या शूटिंग दरम्यानच्या काही व्हिडीओ फोटो, दिसत आहे. ही पोस्ट वाचून आता फॅन्समध्ये पुन्हा मालिका सुरु होणार किंवा या मालिकेचा नवीन सिझन येणार असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत.
तत्पूर्वी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. यश आणि नेहाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मात्र मालिकेत आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागसतेने परीने अर्थात मायराने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’