Saturday, July 6, 2024

रसिका सुनीलचा ‘मिस्ट्री मॅन’ नक्की कोण? सोशल मीडियावरचा फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेली शनाया खूप कमी वेळात लोकप्रिय झाली. तिच्या निरागस आणि सुंदर अभिनयाने तिने खूप कमी वेळात या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. रसिका तिच्या बबली स्वभावमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. शनाया म्हणून प्रसिद्ध झालेली रसिका सुनील सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे रसिकाने सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट.

रसिका सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. रसिकाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक फोटो आणि अनोखा मेसेज तिच्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. रसिकाने एका मुलासोबत तिचे तीन फोटो शेयर करत, “‘दो हजार एक किस… सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२० या वर्षात अनेक वाईट गोष्टी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’ कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस.” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. रसिकांसोबत असलेल्या मुलाचे नाव आदित्य बिलागी असे असून तिने ही पोस्ट आदित्यला टॅग केली आहे. रसिकाने आदित्यसोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

इंस्टाग्रामच्या पोस्टनुसार आदित्य एक इंजिनियर, डान्सर आणि नृत्यदिगदर्शक असून तो लॉस एंजेलिस मधेच राहतो. या फोटोंमधील रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री बघून तिच्या फॅन्सच्या मनात शंका निर्माण झाली आहे. रसिकाने आदित्यसोबत लॉस एंजिलिसमध्ये असताना हा फोटो काढला आहे. रसिकाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिच्यावर नव-वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रसिका पुढील शिक्षणासाठी जेव्हा अमेरिकेत गेली तेव्हा तिची आणि आदित्यची भेट झाली असावी असा अंदाज रसिकाचे फॅन्स लावत आहे.

रसिकाचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. लाखो लोकं तिला फॉलो करतात. रसिकाने पोस्टर गर्ल सिनेमातून तिच्या अभिनयाला सुरुवात केली. मात्र माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने तिला स्टारडम मिळवून दिले. शिक्षणासाठी रसिकाने मध्ये ही मालिका सोडली होती, लॉकडाऊन नंतर रसिका पुन्हा या मालिकेत दिसायला लागली आहे. आता पुन्हा रसिकाने ही मालिका सोडल्याच्या चर्चा सुरु आहेत.

हे देखील वाचा